Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीची आज बैठक; ते तिघे कोण?

Spread the love

 

बेळगाव : खानापूरमधील ज्येष्ठ नेत्याच्या नातवाचे निधन झाल्यामुळे मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीला बहुतांश सदस्य अनुपस्थितीत राहिले. अनेक महत्वांच्या विषयावर सविस्तर चर्चा करुन निर्णय घ्यायचा असल्यामुळे चर्चेअंती कालची बैठक रद्द करण्यात आली. आज शनिवार दि १५ रोजी पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वाची बैठक मराठा मंदिर कार्यालयात आयोजित केली होती. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी बैठकीमागचा उद्देश स्पष्ट केला. केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सहआयुक्तांची भेट घेणे, सांगली, सातारा, पुणे येथील आंदोलनाची रुपरेषा ठरवणे आणि हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात भवन उभारणी करणे या विषयांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. पण, खानापूरमधील ज्येष्ठ नेत्याच्या घरावर दुःखाचा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे खानापूर येथील मध्यवर्ती समितीचे नेते अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे ही बैठक पुढे चालवावी की लांबणीवर टाकावी, असा सल्ला त्यांनी सभासदांना विचारला. त्यावर सभासदांनी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करावी लागणार असल्यामुळे सदर बैठक शनिवारी घ्यावी, अशी सूचना केली. त्यानुसार बैठक शनिवारी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर कार्यालयात घेण्याचे ठरविले. तरी मध्यवर्ती म. ए. समितीच्या सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ते तिघे कोण?

तालुका म. ए. समिती युवा आघाडीने चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता. तो रद्द व्हावा, यासाठी तिघांनी प्रयत्न केले. असा आरोप संपूर्ण शहर आणि तालुक्यात होत आहे. त्यामुळे, ते तिघे कोण याचा खुलासा होणे आवश्यक आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *