Monday , September 21 2026
Breaking News

पोलीस खात्याच्या कारने म्हशींना ठोकरले; दोन म्हशी गंभीर जखमी

Spread the love

 

खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील देसूर नजीक असलेल्या हाड फॅक्टरी जवळ पोलीस खात्याच्या इनोवा कारने रस्त्यात आडव्या आलेल्या दोन म्हशींना ठोकरल्याने दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर‌ इनोवा कारचा समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.

सदर अपघात आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5.40 वाजेच्या दरम्यान हाड फॅक्टरी नजीक घडला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोन म्हैस पैकी, एका म्हैसची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. अपघातात जखमी झालेल्या सदर म्हशींच्या मालकाचे नाव दुर्गाप्पा शिवाप्पा कोरवी कमल नगर देसुर असे आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *