Wednesday , March 4 2026
Breaking News

पहिली-नववीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

 

बेळगाव : पहिली ते सातवीपर्यंतच्या परीक्षा दि. 18 मार्चपासून सुरु होणार आहेत. तर आठवी व नववीच्या परीक्षा 5 मार्चपासून घेण्याचा निर्णय जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आला आहे. सोमवारी शालांत परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत.

बारावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु होणार आहे तर दहावीच्या परीक्षेला 21 मार्चपासून प्रारंभ होईल. याचदरम्यान शालांत परीक्षाही होणार आहेत. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा पूर्ण करण्याच्यादृष्टीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिली ते पाचवी वर्गांसाठी दि. 18 मार्च रोजी प्रथम भाषा, 19 रोजी द्वितीय भाषा, 20 रोजी गणित, 21 रोजी पर्यावरण शिक्षण, 22 रोजी शारीरिक शिक्षण पेपर होणार आहे.
सहावी व सातवी वर्गांसाठी 18 रोजी शारीरिक शिक्षण व कला, 19 रोजी प्रथम भाषा, 20 रोजी द्वितीय भाषा, 21 रोजी तृतीय भाषा, 22 रोजी गणित, 24 रोजी विज्ञान, 25 रोजी समाज विज्ञान या विषयाचा पेपर होईल. आठवी व नववीसाठी 5 मार्च रोजी शारीरिक शिक्षण, चित्रकला, 6 रोजी प्रथम भाषा, 7 रोजी द्वितीय भाषा, 8 रोजी तृतीय भाषा, 10 रोजी गणित, 11 रोजी विज्ञान, 12 रोजी समाज विज्ञान विषयाची परीक्षा घेतली जाणार असल्याचे वेळापत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

आठवी, नववी वर्गांवर शिकवणाऱ्या शिक्षकांवरच दहावीच्या पर्यवेक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आठवी व नववीच्या परीक्षा लवकर घेण्यात येणार आहेत. दहावीच्या परीक्षा सुरु होण्यापूर्वी या परीक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *