बेळगाव : नियती फाऊंडेशनच्या वतीने आर्ष विद्या केंद्राच्या 12 महिला फुटबॉल खेळाडूंना क्रीडा किट भेट देण्यात आले. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत असलेल्या आर्ष विद्या केंद्रातील 12 महिला फुटबॉल खेळाडूना फाऊंडेशनच्यावतीने फुटबॉल शूज व क्रीडा किट भेट देण्यात आले.
संत मीरा शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत, संतमीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, आर्ष विद्या केंद्राचे सोमनाथ चौधरी उपस्थित होते.
प्रारंभी शालेय शिक्षिका प्रीती कोलकार, अमृता पेटकर यांनी प्रार्थना गायली, शिक्षिका रिटा धोंगडी यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली व मेघालयाच्या शालेय मुलींना फुटबॉल शूज व क्रीडा किट दिले व खेळाडूंना आगामी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुजाता दप्तरदार यांनी डॉ. सरनोबत यांचे आभार मानले, याप्रसंगी शालेय क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, पूजा मुचंडी, अनुराधा पुरी, चंद्रकांत तुर्केवाडी, विना जोशी, बसवंत पाटील व शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिटा धोंगडी तर धनश्री सावंत हिने आभार मानले.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …