बेळगाव : बेळगावच्या मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने उद्या रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आनंदवाडी च्या कुस्ती आखाड्यात मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.उद्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती नागराज बसीडोनी विरुद्ध संतोष पडोलकर (पुणे) यांच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती आकाश घाडी विरुद्ध सौरभ पाटील, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदीनकोप विरुद्ध किर्तिकुमार बेनके यांच्यामध्ये होणार आहे. याचबरोबर अन्य पन्नासहून अधिक कुस्त्या पाहण्याची संधी बेळगाव परिसरातील कुस्ती शौकीनांना मिळाली आहे.
उद्याच्या जंगी कुस्ती मैदानात माजी मंत्री, आ.रमेश जारकीहोळी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके,आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार सतीश जारकीहोळी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, आमदार लखन जारकीहोळी, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या जंगी कुस्ती मैदानाचा बेळगाव परिसरातील कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून आखाडा यशस्वी करावा. त्याचबरोबर आखाडा चार वाजता भरवला जाईल व सहा पर्यंत संपवण्यात येईल याची सर्व मल्लांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.