
बेळगाव : नानावाडी रहिवासी संघटनेतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिव जन्मदिनानिमित्त येथे युगप्रवर्तक राजा श्री शिवछत्रपती जीवन कार्य आणि विचार या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले लेखक, प्राध्यापक, श्री. भाऊराव निळू काटकर यांनी या पुस्तकाविषयी संकल्पना व्यक्त केली पुस्तकाचे प्रकाशन नानावाडी रहिवासी संघटना अध्यक्ष रवींद्र सावंत, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नारायण भोसले, प्रमोद मातवंडकर, विकास मांडेकर व नानावाडी येतील महिला प्रतिनिधी व सर्व नागरिक उपस्थित होते. प्रारंभी विकास मांडेकर यांच्याकडून ध्येयमंत्र शिवरायांचे आरती तसेच प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली उदय सावंत, सुदेश मांगुरे, श्रीकांत आजगांवकर, विजय पानसरे, मोहिंदर नंदेश्वर, यशवंत कित्तूर, मोहन पाटील, मनेश पाटील, प्रमोद काकतकर, सिद्धार्थ पाटील, धनंजय कविलकर, विजय काळे, सत्यवान निर्गुण, निशांत मांडेकर, सौ. मंगला आजगांवकर, सौ. सुनीता पुजारी, सौ. सुरेखा मांडेकर, सौ. शिल्पा इत्यादी नानावाडी येथील रहिवासी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. लेखक प्राचार्य कातकर यांना गिरीश धामणेकर यांच्याकडून शिवप्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन विकास मांडेकर यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta