
बेळगाव : दिनांक 19/02/2025 रोजी द.म.शि. मंडळाचे नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
प्रारंभी सुळगे (ये) येथील अश्वारूढ शिव पुतळ्याचे पूजन गावातील सामाजिक कार्यकर्ता श्री. सर्वेश कुकडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष श्री. रामचंद्र शेषाप्पा नंद्याळकर सर, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. बी. बी. पाटील, सुळगे ग्रामपंचायतचे पीडीओ श्री. भुजबली जकाती, श्री. दशरथ पाटील,श्री.रवींद्र पाटील, श्री. परशराम कंग्राळकर, श्री.मनोहर कुकडोळकर, श्री.हिरामणी बेळगावकर, मुख्याध्यापक टी. वाय. भोगण, शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तदनंतर नेताजी हायस्कूल मधील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष श्री. रामचंद्र शेषाप्पा नंद्याळकर यांनी केले तर शिवमुर्ती जवळ श्री भुजबली जकाती ग्राम पंचायत सुळगे (ये) यांनी श्रीफळ वाढविले. तदनंतर कुमारी श्रुती भाऊराव होनगेकर, कुमारी सेजल मधुकर थोरवत, कुमारी राणी रामा इंगळे आणि कुमारी करुणा रमेश गडकरी या विद्यार्थिनींची भाषणे झाली.
समाज विज्ञान विषयतज्ञ श्री. एम. पी. कंग्राळकर यांनी आपल्या भाषणातून शिवजयंती उत्सवाची सुरुवात समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली 1895 मध्ये प्रथमता सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पुजले जातात त्यांचे शुद्ध धोरण, मुच्छदेगीरी, गनिमी कावा, शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. म्हणूनच त्यांची ही जयंती भारतासह संपूर्ण जगभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते अशा परखड शब्दात आपले अनमोल विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. ए. कंग्राळकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. जे. जे. पाटील सर यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta