बेळगुंदी हायस्कूल बेळगुंदी येथे शुभेच्छा
बेळगाव : विद्यार्थीदशेतच आपण कष्टाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. संघर्ष सोबतीला असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहेत, योग्यवेळी ती ओळखता न आल्यामुळे आपण मागे राहतो. प्रतिभावंत होणं म्हणजेच आपल्या अंगभूत कौशल्याना योग्यवेळी आकार देणं होय. संगीत, चित्रकला, क्रीडा व बौध्दिक अशा विविध माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व फुलवता आलं पाहिजे, केवळ इंजिनिअर डाॅक्टर होणं म्हणजे शिक्षण नाही तर या सोबत इतर क्षेत्रांचा विचार करून आपली आवड ठरवून यशस्वी होता येतं यासाठी प्रतिभेचे पंख बाहेरून जोडून स्वैर विहार करता येत नाही आकाशात उंच उंच उडायचे असेल तर हे प्रतिभेचे पंख आतून फुटायला हवेत! असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूरचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी काढले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनीनी गायलेल्या सुंदर स्वागत गणिताने झाली. प्रास्ताविक आणि विश्र्वभारत सेवा समितीचा शैक्षणिक प्रवास मुख्याध्यापक श्री. मनोहर वाय पाटील यांनी विशद केला.
या प्रसंगी विश्वभारत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मान. श्री. विजयराव नंदिहळ्ळी, शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय वडगावच्या इंग्रजी विषय प्राध्यापिका सौ. छाया एस मोरे, शिवसंत श्री. संजय मोरे, रोजीना डिसोझा, शाळेचे हितचिंतक श्री. प्रल्हाद चिरमुरकर, श्री. रामचंद्र पाटील, श्री. कल्लाप्पा बिजगर्णीकर, श्री. सुरेश पाऊसकर, श्री. सुरेश चौगुले, श्री परशराम शहापूरकर, श्री. अशोक पाटील इत्यादी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळ्ळी यांनी विद्यार्थिनी नेहमी आईवडिल व शाळा अभिमान वाटेल असे यश संपादन करावे, उत्तम गुणवत्ता मिळविण्यासाठी फक्त मेहनत कारणीभूत नसते त्या पाठीमागे आशिर्वाद ही लागतात म्हणून मी आपणास भरभरून शुभेच्छा व आशिर्वाद असावे लागतात आणि ते आम्ही देत आहोत.
कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचालन स्नेहा धामणेकर व श्री. भरत पाटील यांनी केले. तर इंद्रायणी गवंडी यांनी आभार मानले या नंतर विद्यार्थ्यांच्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.