बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये वार्षिक क्रीडा संपन्न झाल्या. वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन धर्मस्थळ फंडच्या फील्ड सुपरवायझर सुजाता मॅडम व सेवा प्रतिनिधी अश्विनी मॅडम यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चांगळेश्वरी हायस्कूलचे माजी शारीरिक शिक्षक मधु पाटील हे उपस्थित होते.
मधु पाटील यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक व्यायामाचे महत्व पटवून सांगितले. त्याचबरोबर कोणतेही खेळ माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडवितात. व व्यक्तीला तंदुरुस्त बनवते. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.
क्रीडा महोत्सवाचे क्रीडा ध्वजारोहण अश्विनी मॅडम व सुजाता मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर क्रीडा ज्योतीची मशाल प्रमुख पाहुणे मधु पाटील यांच्या हस्ते सूपूर्द करण्यात आली. या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्व भारत सेवा समितीचे सचिव माननीय प्रकाश नंदिहळी सर उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख व स्वागत पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका चलवेटकर मॅडम व आभार प्रदर्शन के एल शिंदे सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक खेळा मध्ये भाग घेऊन यश संपादन केले. त्याचबरोबर यशस्वीरित्या वार्षिक क्रीडा महोत्सव पार पाडल्या. यासाठी व्हाय. टी. मुचंडी, जी जी होसूर, जी व्ही कुलकर्णी, लक्ष्मण बांडगे, धनश्री गडे, विजया डिचोळकर, मयूर नागेनहट्टी, अमोल देसाई व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
