बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांअंतर्गत लक्ष्मीनगर, मच्छे येथील पूर्ण मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या इयतेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सागर कणबरकर म्हणाले की, गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी शाळांमध्ये पहिल्या इयत्तामध्ये दाखल होणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर साहित्य वितरित केले जात आहे आणि पुढील काळात शैक्षणिक उपक्रमाची व्याप्ती वाढून प्रत्येक मराठी शाळेत पोहचण्याचा मानस असल्याचे सांगितले जाईल.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले आणि म्हणाल्या की, या 2 वर्षात पालकांचा ओढ मराठी शाळेकडे वाढीस लागला आहे आणि त्यामुळे शाळेच्या पटसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
यावेळी युवा समितीचे सहकारी सागर कणबरकर आणि साईनाथ शिरोडकर यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी राहुल हलगेकर, साईनाथ शिरोडकर, सागर कणबरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका एन. बी. बाळेकुंद्री, शिक्षिका एस. सी. धामणेकर, एस. वाय. कोवाडकर आणि एम. एस. गाणिगेर आणि विद्यार्थी उपस्थित होते.