Sunday , September 20 2026
Breaking News

तेऊरवाडीच्या स्वाती पाटील हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड (ता. चंदगड) येथील बी.ए भाग दोनची स्वाती लक्ष्मण पाटील हिची ठाणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. ही निवड 17 फेब्रुवारी 2022 रोजी सांगाव कागल येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा अजिंक्य पद स्पर्धेतून झाली आहे. त्यामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे. याबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे सचिव एम. व्ही. पाटील, प्रा. प्राचार्य व्ही. आर. पाटील आणि सर्व पधादिकारी यांनी अभिनंदन केले. तिला शारीरिक संचालक प्रा. आर. टी. पाटील, पांडुरंग मोहनगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *