संकेश्वर (प्रतिनिधी) : राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाला धावती भेट देऊन देवदर्शनाबरोबर श्रींचा आशीर्वाद घेतला. निडसोसी मठात महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंत्रीमहोदयांनी आपला सहभाग दर्शविला. यावेळी निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी मंत्री उमेश कत्तीं यांना महाशिवरात्र महोत्सवाला भक्तगणांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. मंत्री उमेश कत्तीं यांनी स्वामीजींना राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आपण आजच बेंगळूरला रवाना होत असल्याचे सांगितले. यावेळी संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, पृथ्वी कत्ती, परगौडा पाटील, पवन पाटील, नगरसेवक रोहण नेसरी उपस्थित होते. निडसोसी मठातर्फे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी मंत्रीमहोदयांचा सन्मान केला.
Check Also
संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
Spread the love संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. …