बिजगर्णी….. ग्रामपंचायत बिजगर्णी व नरसिंग गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये यांच्या संयुक्त विद्यमाने गेले सहा दिवस सुरू असलेले राष्ट्रिय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले.
यासाठी विशेष बिजगर्णी ग्रामपंचायतकडून सहकार्य लाभले असून रेखा नाईक, मनोहर बेळगावकर, वसंत अष्टेकर, यल्लापा बेळगावकर, श्रीरंग भास्कर, ऍड. नामदेव मोरे, पीडीओ रविकांत, वाय पी नाईक, के आर भास्कर, यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे सहा दिवस चाललेले शिबिर उत्साहात संपन्न झाले. त्याबद्दल प्रभारी प्राचार्य सौ शीतल देसाई, एन एस एस विभाग प्रमुख प्रा. पी व्ही नाकाडी विद्यार्थीवर्ग यांनी समाधान व्यक्त केले
वीर सौध योगा केंद्र टिळकवाडीतर्फे दोन तास योगा प्राणायाम शिकवले आरोग्य हे महत्त्वाचे आहे, ध्यान केल्याने आत्मविश्वास, एकाग्रता वाढते असे योगा प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांनी सांगितले यावेळी उमेश सुपाले, वाय पी नाईक, इतर मान्यवर सकाळी सहा वाजता उपस्थित राहून विद्यार्थी शिक्षकवर्ग लाभ घेतला
यावेळी रात्री हजगोळी गावातील कवी शि. तु. गावडे यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दोन तास त्यांनी निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, राजकीय विषयांवर लेखन केलेल्या कविता सादर करुन रंगत आणली. चौथी शिकलेले हे कवी चारशे कविता, नाटक, कथा लेखन असा यांच्या साहित्यप्रवास सुरू आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. हजारो नागरिकांनी आस्वाद घेत दाद दिली. जादूचे प्रयोग, समुह नृत्य, लावणी, भारूड अशा विविध कला सादर करत विशेष मनोरंजन केले.
एक दिवस कावळेवाडी गावातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले श्री चव्हाटा देवालय समोर महाविद्यालयचे प्राचार्य सौ. शीतल देसाई, पी व्ही नाकाडी शिक्षकवर्गाचे पुष्प देऊन स्वागत केले. जोतिबा मोरे, ऍड. नामदेव मोरे, वाय पी नाईक, केदारी कणबरकर, गोपाळराव देशपांडे, रघुनाथ मोरे, लक्ष्मण जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
सहाव्या शेवटच्या दिवशी समारोप समारंभ के आर भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी व्यासपीठावर मनोहर बेळगावकर, वसंत अष्टेकर, यल्लापा बेळगावकर, रेखा नाईक, ऍड. नामदेव मोरे, हर्षवर्धन कोळसेकर, शीतल देसाई, वाय पी नाईक, एस जी पाटील, पी व्ही नाकाडी, टी व्ही सावंत, बी जी कनगुटकर, पुंडलिक जाधव, मारुती जाधव, मलप्रभा जाधव यांच्या हस्ते गौरव पत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सहा दिवस चाललेले हे शिबिर शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. योग्य नियोजन भोजन व्यवस्था, रहाण्याची सोय, पाणी या सर्व बाबी ग्रामपंचायत कडून सहकार्य लाभले शिबिर यशस्वी झाले. त्याबद्दल प्रभारी प्राचार्य सौ. शीतल देसाई यांनी विशेष आभार मानले. पी व्ही नाकाडी, माजी आमदार राजेश पाटील यांनी समाधान व्यक्त केले.