बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
बबलादी यात्रा आटोपून घरी परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कप्पळगुद्दी आणि मुन्याळ केनॉळजवळ ही घटना घडली. एका ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये २५ हून अधिक लोक बबलादी येथे गेले होते. अपघाताची माहिती मिळताच मूडलगी येथील व्यंकटेश हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींवर प्राथमिक उपचार केले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. हारुगेरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
Belgaum Varta Belgaum Varta