
बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचा लवकरच कायापालट होणार आहे. आज मराठा मंदिर येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये हुतात्मा स्मारकाचा कायापालट करत त्या ठिकाणी भव्य हुतात्मा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. स्मारक संबंधित इतर विषय चर्चा करण्यात आले. तरी मध्यवर्ती समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असे ठरविले गेले. एकांदरीत सीमावासीय मराठी जनतेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान वाढविण्यासाठी उचललेलं हे पाऊल इतक्या वर्षानंतर सत्यात उतरणार आहे.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील व इतरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, बी. एस. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, मल्लाप्पा गुरव, मल्लाप्पा पाटील, लक्ष्मण होनगेकर, दीपक पावशे, शंकर कोनेरी, डी. बी. पाटील, अंकुश पाटील, रामचंद्र कुद्रेमानीकर, पियुष हावळ आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta