बेळगाव : एकट्या महिलेच्या घरात घुसून तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दरोडेखोराला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या २७ जानेवारी रोजी राणी चन्नम्मा नगर, बेळगाव येथील दुसऱ्या चौकात एका दरोडेखोराने एका महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ३ लाख ५० हजार किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. बेळगाव येथील शास्त्रीनगर येथील घरातून उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराकडून ३ लाख ५० हजार किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी उद्यमबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta