
बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तीन प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि सत्कारमूर्ती महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात अनिषा सुळेभावी यांच्या प्रार्थनागीताने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत एचआर प्रमुख कावेरी लमाणी यांनी केले तर प्रास्ताविक पद्मा औशेकर यांनी केले.
त्यानंतर डॉ. सुरेखा पोटे, लता बायाण्णाचे आणि रेणू लोखंडे यांना अनुक्रमे सल्लागार विद्या सरनोबत, प्रीती चौगुले, संचालिका रेखा बामणे यांच्याहस्ते शाल, स्मृतिचिन्ह भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर सत्कारमूर्ती प्रेरणादायी महिलांनी आपला प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडून सांगितला.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. देगीनाळ यांनी तिन्ही सत्कारमूर्तीच्या प्रेरणादायी वाटचालीचे कौतुक करून आपण समाजासाठी एक आदर्श असल्याचे सांगितले.
यावेळी संजीवीनी काळजी केंद्रातील रहिवासी सदस्या कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार समुपदेशक सावित्री माळी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta