बेळगाव (वार्ता) : अलीकडे कोंकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणवासीयांना बराच फटका बसला आहे. या भागातील नागरिकांना मदतीसाठी अनेक जण युद्धपातळीवर काम करीत आहेत, सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने देखील कोकणातील पूरग्रस्तांना 150 किलो तांदूळ, औषधे, हँड ग्लोव्हस, सॅनिटायझर 5 लिटर, फिनायल 10 लिटर, टॉवेल 100, बेडशीट्स 20 आणि चादर 20 नग आणि इतर साहित्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने पूरग्रस्तांसाठी राबविण्यात येणार्या मदतकार्यास सोपविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मदन बामणे, सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, गुंडू कदम, आशिष कोचेरी उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे, विश्वनाथ पाटील, पुंडलिक चव्हाण, कल्लाप्पा पाटील, मल्लेश बडमंजी यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.