बेळगाव : रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवल्याची घटना बेळगावात घडली.
महांतेश नगर येथे राहणाऱ्या उमा महेश्वर मल्लापूर या त्यांची सून प्रेमा दुरदुंडेश्वर मल्लापूर हिच्यासोबत 12 मार्च रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून घरी परतत असताना दोन दुचाकीस्वारांनी मुत्तु फायनान्स, अरिहंत बिल्डिंग, अंजनेय नगर समोर गळ्यातील 90,000/- रुपयांची 30 ग्रॅम सोन्याची चेन लांबवली.
महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta