बेळगाव : रंगपंचमीदिनी डिजेवर महाराष्ट्र गीत लावून नाच केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बेळगाव चव्हाट गल्ली येथे रंगपंचमी दिवशी, महाराष्ट्र गीत लावून तरुणाईने रंगोत्सवाचा आनंद लुटला. मात्र पोटशूळ उठलेल्या काही कन्नडीगांच्या तक्रारीमुळे मार्केट पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
वैभव गावडे, सुनील जाधव आणि डीजे ऑपरेटर विरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात सामाजिक वातावरण गढूळ केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डीजेवर महाराष्ट्र गीत लावून रंगोत्सव साजरा करताना पाहून तेथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी यासंदर्भात सुमोटो केस दाखल करून घेण्यात का कुचराई केली, मौन का बाळगले असा संतप्त सवाल कन्नडिंगांनी केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta