बेळगाव : भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना बेळगावच्या गणेशपूर येथे घडली.
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गणेशपूर येथील ५ वर्षीय प्राविण्या बोयर गंभीर जखमी झाली. भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला करून तिच्या पोटाला, पाठीला आणि पायाचा चावा घेतला.
जखमी मुलीला बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवघ्या एक दिवसापूर्वी गणेशपूर येथे एका मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत असतानाही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा संताप जनतेने व्यक्त केला आहे.