
बेळगाव : कित्तूर विकास प्राधिकरणाला 200 कोटी देण्यात यावे या मागणीसाठी बैलहोंगल पूर्णत: बंद पाळून रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.
चन्नम्मा समाधी स्थळापासून निघालेली ही रॅली बाजार रोड, मेदर गल्ली, मरडी बसवेश्वर मंदिर, धारवाड बायपास रोड, चन्नम्मा सर्कल, एपीएमसी गणेश मंदिर, इंचल क्रॉस, बस स्टँड मार्गे रायण्णा सर्कलवर आली. रस्त्यावर आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
त्रिशवीरमठाचे प्रभुनीलकंठ स्वामीजी, माजी आमदार डॉ.विश्वनाथ पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदकुमार वकुंदमठ, वकील श्रीशैला बोलन्नवर, एफ. एस. सिद्धानगौडा, मुरुगेशा गुंडलुरा, एम.वाय.सोमन्नवर, एम. आर. मेलवंकी, शंकरा मदलगी, व्यापारी विजय मेटगुड कित्तूर कर्नाटक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महादेव तलवार, जिल्हाध्यक्ष शिवानंद कोलकार, कित्तूर सेना कर्नाटकचे कार्यकर्ते, सर्व व्यापारी, मालक, कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व व्यावसायिकांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला.
Belgaum Varta Belgaum Varta