
बेळगाव : किणये गावातील तिपाण्णा डुकरे हा युवक गावची समस्या घेऊन पंचायतमध्ये गेला असताना तेथील ग्रामपंचायत अधिकारी यांना मराठी येत असून सुद्धा मराठी बोलले नाहीत, त्यामुळे गावच्या समस्यां विषयी अधीच वैतागलेला तिपाण्णा डुकरे याने मराठीत बोलण्याचा आग्रह धरला, पण अधिकाऱ्याराला मराठी येत असताना त्यांनी मराठी न बोलता आपल्या कामाच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी उलट तिपाण्णा डुकरे यालाच कन्नड बोल अशी अरेरावीची भाषा वापरली आणि त्याच्या नावे तक्रार देऊन गुन्हा घातला आणि त्याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
सदर प्रकरणानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तिपाण्णा डुकरे याला अटक झाल्यानंतर सामाज माध्यमावर अधिकाऱ्याने केलेल्या प्रकारचा आणि प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे तिपाण्णा यांची जामिनावर सुटका झाल्यावर किणये ग्रामस्थांनी शुभम शेळके आणि युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना गावात बोलावून जाहीर सत्कार केला तसेच युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने तिपाण्णा डुकरे यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेसाठी पक्ष संघटना बाजूला ठेऊन एकत्र येऊन लढले पाहिजे, आणि कायद्याच्या मर्यादा राखून प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे. यासाठी तिपाण्णा डुकरे यांच्या सारख्या युवकांनी आपल्या मराठीसाठी पुढे आले पाहिजे अशा भावना आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी गेल्या काही दिवसांत ग्रामपंचायत अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी हे आपल्या चुकावर पडदा टाकण्यासाठी कन्नड मराठी भाषिक मुद्दाचे राजकारण करत आहेत त्यामुळे आपण यानंतर कायद्याच्या चौकटीत त्यांना जाब विचारावा असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, पुंडलिक दळवी, सुभाष डुकरे, अजित डुकरे, युवा समिती उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर, उपाध्यक्ष प्रवीण रेडकर, चिटणीस सचिन दळवी यांच्यासह किणये गावातील महादेव बिर्जे, बबन डुकरे, महेश गुरव, महेश खामकर, पांडुरंग सुतार, महादेव सुतार, मनोज बिर्जे, सिद्धाप्पा डुकरे, सागर बिर्जे, सूरज खंनुकर, अमित बिर्जे, संजय डुकरे, विनायक डुकरे, रमेश मासेकर, माधुरी महादेव पाटील, अर्चना मुतगेकर, शांता बिर्जे, गीता मासेकर, मालु मासेकर, माधुरी गुरव, माधवी मुतगेकर, गंगु डुकरे, अश्विनी मुतगेकर, रेखा बिर्जे आदीसह तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta