बेळगाव (वार्ता) : हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचा काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, वाघवडे, रंगधोळी, मार्कंडेयनगर, कंग्राळी खुर्द, वाल्मीकी नगर आणि मच्छे औद्योगिक वसाहत परिसर या भागातील वीज पुरवठा उद्या बंद राहणार आहे.
त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलुर, मोरब, जांबोटी, ओलमनी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली, मुडवी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमनी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, बेटणे, पारवाड, चिगुळे, मान, सडा, चोर्ला, जुने व नवे हुळंद या भागातील वीज उद्या खंडित केली जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
Check Also
सायकल फेरीत सामील झालेल्यांवर कडक कारवाई करणार : मंत्री सतीश जारकीहोळी
Spread the love बेळगाव : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने १ नोव्हेंबर …