
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर दि. 1 एप्रिल ते 31 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके यांनी दिली.
प्रशिक्षण शिबिरात 10 वर्षापासून 21 वर्षांपर्यंत मुले-मुली सहभाग घेऊ शकतात. प्रशिक्षण उत्तम शिंदे, नामदेव सावंत, गणपत गावडे, प्रशांत मंकाळे, सुधाकर चाळके आदी प्रशिक्षक देणार आहेत.
प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी उत्तम शिंदे 9449547533, गौरव जाधव 7829222691, चेतन दोडमणी 8867213306, वैदुर्या नाईक 7026719824, प्राजक्ता निलजकर 7022506074 यांचेशी संपर्क साधावा, असे प्रकाश कालकुंद्रीकर कळवितात.
Belgaum Varta Belgaum Varta