Saturday , March 7 2026
Breaking News

चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात शनिवार दिनांक 29/3/2025 रोजी सकाळी 6 ते 8 पर्यंत विजया ऑर्थो अँड ट्रुम सेंटर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रवी पाटील व बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्लीतर्फे संयुक्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 6 ते 8 पर्यंत केले होते. अनेक गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान गणेशोत्सव मंडळाकडून केले आहे.
या शिब‌िरात ऑर्थोपेडिक, नाडीपरीक्षा, शरीरपरीक्षा, रक्तदाब, ब्लड शुगर, योग, डायट प्लॅन, व इतर आदी जनरल आजारांची विनामुल्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी गरजूंना चिकित्सेबरोबर मोफत किंवा सवलतीच्या दरात औषधेही देण्यात येणार आहे असे डॉ. रवी पाटील यांनी सांगितले. तसेच डॉ. उमेश शिंदोळकर व त्यांच्या सहकार्यांकडून विविध तपासण्या करण्यात येणार आहे.
अधिक माहिती संपर्क 9964370261 सुनिल जाधव.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *