बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रसेवा दलाचा सांगता समारंभ पार पडला. दिनांक 24 मार्च 2025 ते 28 मार्चपर्यंत राष्ट्रसेवा दलाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी उद्घाटक म्हणून माननीय सुरेश पाटील उपस्थित होते. राष्ट्रसेवा दल ही एक स्वयंसेवी संघटना आहे, जी युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता आणि विज्ञानाभिमुखता यांसारख्या मूल्यांची शिकवण देण्यासाठी काम करते. युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जाति-धर्मनिरपेक्षता, समता आणि विज्ञान यांसारखी मूल्ये शिकवणे, शिस्त आणि व्यवस्थापनाला मदत करणे तसेच समाजात समता आणि न्यायाचे वातावरण प्रस्थापित करणे हेच राष्ट्रसेवा दलाचे उद्दिष्ट.
दिनांक 28 मार्च रोजी या कार्यक्रमाचा सांगता समारंभ पार पडला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे उपस्थित होते. तर प्रा.आनंद पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, झांज, सामाजिक भान या विषयावर नृत्य सादर केले. तसेच’ सदैव सैनिका पुढेच जायचे ‘हे प्रेरणा गीत सादर करण्यात आले. युद्ध नको शांती हवी, जे आपण शिबिरात शिकलो ते दैनंदिन जीवनात आचरणात आणून चांगला नागरिक घडविण्याचे ध्येय अजित शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्रा.आनंद पाटील यांनी राष्ट्रसेवा दलाचे कार्य विशद केले. शिबिरामध्ये बौद्धिक सत्र शिक्षक सविता पवार, इंद्रजीत मोरे, नारायण उडकेकर, संज्योत बांदेकर, गौरी चौगुले, प्रसाद सावंत यांनी घेतल्याबद्दल तसेच जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल कर्मचारी वंदना पाटील, यल्लाप्पा तरळे यांचे कौतुक करण्यात आले. साईराज गुरव, हर्ष पाटील, आर्या देसाई, प्रगती पाटील, तृप्ती भगत या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते बाबा नदाफ, सदाशिव मगदूम, कोमल मगदूम, मिलिंद कांबळे, पार्थ हेगाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत तर शिक्षक माया पाटील, शबाना मुजावर, रूपाली हळदणकर, शर्मिला कांबळे, अक्षता मेलाशंकर, अरूण बाळेकुंद्री, स्नेहल बेळगावकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी सर्पमित्र आनंद चिठ्ठी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीदादा कागणीकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहल बेळगावकर तर आभार माया पाटील यांनी मानले.