
बेळगाव : मराठी भाषेसाठी व सीमा प्रश्नासाठी लढणाऱ्या युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे. या नोटीसीवरून त्यांना जिल्हा बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वी देखील मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कर्नाटक प्रशासनाने आपले मराठी द्वेष्टे पण दाखवत शुभम शेळके या युवा नेत्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
शुभम शेळके यांच्यावर वारंवार मराठी भाषिक आणि कन्नड भाषिकात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत बेळगावातील कॅम्प, माळमारुती, खडेबाजार, टिळकवाडी अशा विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता शुभम शेळके यांच्या भूमिकेकडे सीमावासियांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठी भाषिकात संतापाची लाट उसळली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta