
फौंडेशनच्या वतीने संस्थापक वाय. एन. मजुकर यांचा ८२ वा वाढदिवस उत्साहात साजरा
बेळगाव : समाजामध्ये मुल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात कारण म. फुले, राजाराम मोहनराय, कर्मवीर भाऊराव पाटील, या लोकांनी ज्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये जीवनामध्ये बदल घडवून आणला. ती प्रेरणा आजच्या शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. साने गुरुजीं सारखा आदर्श शिक्षक बनण्याची स्वप्ने पाहुन ती कृतीत उतरविणे काळाची गरज असून वाय. एन. मजुकर सरांनी सुध्दा श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्चा माध्यमातून सर्वसामान्य मानसांच्या घरापर्यंत ज्ञानाची कवाडे पोहचविण्याचे कार्य अत्यंत निष्टापूर्वक, निरपेक्ष भावनांनी केले असून त्यांचा कृतज्ञापूर्वक ८२ वा अभिष्टचिंतन सोहळा असून शिक्षकांना समाजाने अशी गुरुबद्दलची आदराची भावना ठेवून त्यांना आणखी प्रोत्साहन देवून खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या चळवळीत पाठींबा देऊन नवा बलशाली भारत उभा करावा, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मा. सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी केले.

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येभील सभागृहात प्रमूख वक्ते म्हणून “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची जबाबदारी” या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक-अध्वस वाय. एन. मजुकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनीच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. अध्यक्ष वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर, उपाध्यक्ष दौलत कुगजी, संचालक चंद्रकांत पाटील, माजी मुख्याध्यापक बी. बी. पाटील, फौंडेशनचे उपाध्यक्ष नरेंद्र मजुकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन् होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. संचालिका सौ. कांचन मजुकर यांनी श्री चांगळेश्वरी देवीचे फोटो पूजन केले. प्रमूख वक्ते प्रा. मधुकर पाटील यांनी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मालार्पण केले. फौंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी मुख्याध्यापक बी. बी. पाटील, सचिव प्रसाद मजुकर, पत्रकार सी. एम. गोरल यांनी आपले विचार मांडले. या प्रसंगी डॉ. तानाजी पावले, देसूरकर, शहापूरकर, येळ्ळूर कुस्तीगीर संघटना, येळ्ळूर मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र हायस्कूलच्यावतीने मुख्याध्यापक बी. बी. कानशिडे, के. बी. पोटे यांनी मजुकर सरांचे अभिष्टचिंतन केले. व्यासपाठीवर शिक्षक शिवाजी हवाळानाचे, एलआयसी प्रतिनिधी आनंद मजुकर, तसेच येळ्ळूर, शिवठाण, कारलगा, मणतुर्गा, लोकोळी, गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सहपत्नीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक एम. पी. गिरी यांनी केले. चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुवर्य वाय.एन. मजुकर फौंडेशनच्चा पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta