Monday , December 4 2023

अनधिकृत लाल-पिवळा स्वातंत्र्य दिनापूर्वी हटवा

Spread the love

बेळगाव युवा समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्र्यांना सिमावासीयांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन पाठवणार
बेळगाव (वार्ता) : राष्ट्रध्वजाच्या अपमाना संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारताचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांना समस्त सिमावासीयांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन पाठवणार.
संपूर्ण देशभरात एक देश एक तत्व असताना बेळगावात प्रादेशिक आयुक्त कार्यालय आवार, महानगरपालिका आणि इतर सरकारी ठिकाणी अनधिकृत लाल- पिवळा झेंडा फडकविण्यात आले आहेत, आणि प्रशासन या अनधिकृत झेंड्याना संरक्षण पुरवीत आहे, तरी हे अनधिकृत लाल- पिवळे झेंडे येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी हटविण्यात यावेत यासाठी भारताचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांना संपुर्ण सिमाभागाच्या नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन ते निवेदन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तरी या स्वाक्षरी मोहिमेत सीमाभागातील सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, वासू सामजी, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, संतोष कृष्णाचे, प्रवीण रेडकर, नारायण मुचंडीकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा पूर्वतयारीसाठी उद्या व्हॅक्सीन डेपो येथे समिती कार्यकर्त्यांनी जमावे

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 4 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *