कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : बाचणी (ता. करवीर) गावचे सुपुत्र व सध्याचे चंदगड पोलिस ठाण्याकडे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले विश्वजीत गाडवे हे खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक बनले. या निवडीबद्दल त्यांचा चंदगड पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 2011साली विश्वजीत गाडवे यांनी खात्यांतर्गत परीक्षा दिली होती. त्यानंतर राज्यात न्यायालयीन वादात सदर परीक्षेचा निकाल रखडला होता. एक जुलैला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून दोन दिवसांपूर्वी त्यांना नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी पत्र दिले आहे. तब्बल दहा वर्षांनी उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पोलीस निरीक्षक तळेकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पीएसआय अंकुश कारंडे, हवालदार कसेकर, हवालदार जाधव, हवालदार बांबळे यांच्यासह सुतार, पाटील, कृष्णा पाटील, दिगंबर गुरव, सूर्यकांत सुतार, अमोल कांबळे, नितीन डोंगरे उपस्थित होते.
विश्वजीत गावडे हे 2005 आली पुणे येथे भरती झाले असून यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी प्रयत्न केले होते, दोन वेळा त्यांची संधी हुकली होती. मात्र तिसऱ्या वेळेला परीक्षा देऊन त्यांना तब्बल दहा वर्षांनी संधी मिळाली.
