Saturday , December 13 2025
Breaking News

विद्यार्थ्याच्या विकसित होण्यामध्ये शिक्षण व खेळाचे योगदान खूप मोठे : रामनाथकर

Spread the love

 

हॉकी बेळगावतर्फे प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

बेळगाव : कोणत्याही विद्यार्थ्याच्या विकसित होण्यामध्ये शिक्षण खेळाचे योगदान खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांना खेळाकडेही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हॉकी बेळगावने मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर करून होतकरु विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा. जास्तीत जास्त युवक सहभागी झाले तर प्रत्येकाच्या कलेला वाव मिळेल आणि नक्कीच देशात देखील बेळगावचे हॉकी मधील नांव उज्वल पुन्हा एकदा होईल असे आवाहन मला वाटते असे उद्गार मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर यांनी काढले.
डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर हे हॉकी बेळगाव आयोजित मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, बेळगावातील मुलांमध्ये हॉकी विषयी असलेली आवड नक्कीच त्यांना यशापर्यंत पोहोचवेल. मुला-मुलींना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विशेषता पालकांचे कौतुक करावं तितके कमी आहे.
शशिकला सिंगबाळ हिच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी हॉकी बेळगावचा इतिहास व हॉकीसाठी असलेला अपेक्षा यांची माहिती व पाहुण्यांचे स्वागत प्रकाश कालकुंद्रीकर यांनी केले.
प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून व आॕलिंपियन सुभेदार बंडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर यांनी केले.
प्रमुख पाहुणे डेप्युटी कमांडंट कर्नल जनरल चंद्रनील रामनाथकर, महापौर मंगेश पवार, माजी महापौर आनंद चव्हाण, अशोक आयर्न ग्रुपच्या जयभारत फाउंडेशनचे संचालक बसवनगौडा पाटील, बीडीएचएचे अध्यक्ष धनंजय पटेल यांचा हॉकी बेळगावच्या वतीने अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, दत्तात्रय जाधव यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
महापौर मंगेश पवार व माजी उपमहापौर यांनी हॉकी प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा देऊन हॉकीसाठी ऍस्ट्रोटर्फ मैदान होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला उपाध्यक्षा पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, श्रीकांत आजगावकर, नामदेव सावंत, उत्तम शिंदे, गणपत गावडे, विकास कलघटगी, सुरेश पोटे, अशोक राणे, आशा होसमणी, सविता हेब्बार, प्रकाश बिळगोजी, प्रशांत मंकाळे, संजय शिंदे, अश्विनी बस्तवाडकर, राजेंद्र पाटील, गोपाळ खांडे, प्रकाश बजंत्री, जगदीश अमत्यागौडर, शांताप्पा नाडगुडी, पत्रकार नासिर शहा, साजीद शेख, सौ. उज्वला प्रवीण पाटील, वेटलिफ्टर स्वस्तिका मिरजकर आदी उपस्थित होते. शेवटी सौ. सोनाली पाटील हिने आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना

Spread the love  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *