
बेळगाव : क्षुल्लक कारणामुळे 25 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अनगोळ येथे घडली. यामध्ये शिवराज तानाजी मोरे रा. कामत गल्ली हा गंभीर जखमी झाला आहे.
शिवराज मोरे हा युवक कोनवाळ गल्लीतील एका ‘स्पेअर स्पार्टच्या दुकानात काम करतो. आठ-दहा युवकांच्या टोळक्याने दुकानात शिरून शिवराजला जबरदस्तीने बाहेर काढले आणि दुचाकीवर बसवून अनगोळला नेले आणि लाठ्या- काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याला दुकानातून जबरदस्तीने बाहेर काढून दुचाकीवरून नेतानाचे चित्रण सीसीटिव्हीत कैद झाले आहे.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकावर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी शिवराज मोरे यांच्या आई कमल मोरे यांनी मुलाला किरकोळ कारणावरून जबरदस्तीने नेऊन बेदम मारहाण केल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस स्थानकात दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta