
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील धामणे गावात शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर दुसऱ्या एका अज्ञात महिलेने जीवघेणा हल्ला करून तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
६० वर्षीय विमलाबाई बाळेकुंद्री या महिलेवर अज्ञात महिलेकडून गंभीर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात महिलेचे कानातले आणि इतर सोन्याचे दागिने लुटले गेले. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर उपचारासाठी बेळगाव बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिला पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात पाठवण्यात आले. विमलाबाई बाळेकुंद्री या शेतात काम करत असताना अज्ञात महिलेकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta