बेळगाव : बेळगावच्या महिला धावपटू शितल कोल्हापुरे यांनी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय स्तरावरील अथेलेटिक्स स्पर्धेत स्पृहणीय संपादन केले आहे.
खेलो मास्टर्स अणि फिट मास्टर यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे 11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान चौथी खेलो मास्टर्स राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील 400 मी. आणि 200 मी. धावणे शर्यतीत बेळगावच्या शितल कोल्हापुरे यांनी रौप्य पदक, त्याचप्रमाणे 800 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्ण पदक पटकविले. यापूर्वी देखील शितल कोल्हापुरे यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके पटकावली आहेत. उपरोक्त यशाबद्दल सध्या बेंगलोर येथे ॲथलेटिक्स प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या शितल कोल्हापुरे यांचे क्रीडा क्षेत्रात अभिनंदन होत आहे.