बेळगाव : भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात १२ वर्षांची ‘नित्या’ ही वाघीण पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
श्री चामराजेंद्र प्राणी संग्रहालय, म्हैसूर येथून तिला प्राणी अदलाबदल योजनेअंतर्गत येथे आणण्यात आले आहे. १२ वर्षांची वाघीण ‘नित्या’ नुकतीच भुतरामनहट्टीतील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात दाखल झाली आहे.
‘नित्या’च्या आगमनामुळे प्राणी संग्रहालयातील प्राणिप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तिच्या वास्तव्याची सर्व तयारी करण्यात आली असून, नव्या परिसरात तिचे नीटसे रूतण्यासाठी प्राथमिक निरीक्षण सुरू आहे. ‘नित्या’साठी विशेष देखभाल केली जात असून तिच्या आरोग्याची आणि वातावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. लवकरच ती पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta