बेळगाव : बसवन कुडची येथील बेळ्ळारी नाल्यावर जुना ब्रिज होता. तो मोडकळीस आला होता शेतकऱ्यांना वापर करण्याकरिता समस्याचा सामना करावा लागत होता. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्याकडे मागील वर्षी निवेदन देऊन नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी केली होती.
आमदारांनी लागीच मागच्या महिन्यामध्ये या पुलाकरिता निधी मंजूर करून भूमिपूजन केले होते. तर आज ते एका महिन्यांमध्ये ब्रिज बांधून पूर्ण झाले असून आज आमदार अनिल बेनके यांनी या ब्रिजची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना म्हणाले की, या पुलाचा वापर शेतकऱ्यांनी योग्य तो करावा. यापुढे कोणतीही समस्या होणार नाही नसल्याचे आमदारानी सांगितले.
यावेळी बसवन कुडची येथील शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या सर्व उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta