
बेळगाव : दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दि. 2 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय परीक्षा- मूल्यमापन मंडळाने दिली आहे.
21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त सार्वत्रिक सुट्टी असल्याने 2 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
या परीक्षेसाठी 8.93 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून 2 मे रोजी सकाळी 11.30 वाजता शालेय मूल्यमापन समिती, शिक्षण आणि साक्षरता विभाग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सदर निकाल जाहीर करण्यात येतील.
विद्यार्थ्यांना कर्नाटक सरकारच्या https://karresults nic.in या संकेतस्थळावर दुपारी 12.30 नंतर निकाल पाहता येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta