
येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक भरतकुमार मुरकुटे यांचे मंगळवार (ता. 29) रोजी आकस्मिक निधन झाले. त्यानिमित्त नेताजी सोसायटीच्या सभागृहामध्ये शुक्रवार (ता. 2) रोजी त्यांना सोसायटीचे संचालक, सल्लागार व कर्मचारी वर्गाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. कै.भरतकुमार मुरकुटे यांच्या फोटोचे पूजन सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील व व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी केले. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन संजय मजूकर, सल्लागार के. एन. पाटील, विद्यमान चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे, व संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सोसायटीसाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली. यावेळी सोसायटीचे संचालक किरण गिंडे, भोमाणी छत्र्यांन्नावर, रवींद्र गिंडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, डॉ. कुलदीप लाड, पांडुरंग घाडी, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, रवींद्र कणबरकर, विजय धामणेकर आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta