
बेळगाव : दरवर्षी पुराचा फटका त्यात कोणत्याही सरकारने विकासाचे फक्त दिलेले आश्वासन म्हणजे येथील शेतकऱ्यांना गाजराची पुंगीच वाजवत बसायच झालय. येथील शेतकरी अल्पभूधारक त्यात मुख्य व्यवसाय शेती. त्यात हंगामाआधीच अवकाळी पाऊस सुरु झाल्याने अर्धवट मशागत करुन पेरणी केल्यास पूर येण्याआधी भाताची उगवण सहा इंच ते एक फुटापर्यंत झाल्यास पूर आलातरी थोडा टिकाव धरतो. अन्यथा पाणी मुळका एक झाल्यास ते तात्काळ कूजून नाश होतं. मग परत पेरणी किंवा रोप लावणी केल्याशिवाय पर्याय नाही. गेल्यावर्षी पहिली पेरणी गेली दुसऱ्यांदा लावणी केली. परत पूर आला आणि खर्च डोक्यावर, पीकं मात्र कुचकामी. सरकारची भरपाई म्हणजे धन्यास कण्या, चोरास मलीदा. ती गुंठ्याला 70 रु. म्हणजे एकरी 2800 रु. पण शेतकरी म्हणतात तुमची भरपाई नको फक्त नाला साफ करा आणि आम्हाला पीकं घेण्यासाठी सोय करुन द्या.
अलिकडे येथील शेतकऱ्यांना अस वाटू लागलय कि या भागातील शेतकरी संपवून बुडामधे घालून कंगाल करायच असे कुटिल धोरण दिसतय. दरवर्षी बळ्ळारी नाला विकासाची आश्वासनं दिली जातात ती फक्त हवेत विरतात. त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना हे मात्र नित्याचेच.
Belgaum Varta Belgaum Varta