
बेळगाव : सदाशिव नगर परिसरात सोमवारी मध्यरात्री उशिरा गोवा पासींग असलेल्या इनोव्हा गाडीने भीषण अपघात घडवला. यामध्ये एक मिनी गुड्स रिक्षा, ५ दुचाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदाशिव नगरमधील अंकुश शॉपसमोर सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा गाडीने दुकानासमोर उभ्या असलेल्या मिनी गुड्स रिक्षा आणि ५ दुचाकींना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, इनोव्हा थेट दुकानात घुसून थांबली. यामुळे वाहन मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या अपघातात इनोव्हा गाडीतील तीन जण जखमी झाले आहेत. गाडी अत्यंत वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta