
बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगळुरू यांनी मराठी भाषेवर आधारित स्पर्धा आयोजित केली होती. यंदाचे अभिजात मराठी दर्जा मिळाल्याचे औचित्य साधत, मंडळाने “शब्दाक्षरी” ही स्पर्धा अखिल कर्नाटकासाठी भरवली होती.
गाण्याची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारीत विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा, शब्दाक्षरी झाली. स्पर्धेत अखिल कर्नाटकातील 31 गट सहभागी झाले होते. या शब्दाक्षरी स्पर्धेत वि.गो.साठे प्रबोधिनीच्यावतीने मराठी विद्यानिकेतन येथील शिक्षिका हर्षदा सुंठणकर व स्नेहल पोटे यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले. 4 मे रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक, 11 मेच्या उपांत्य फेरीत प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीसाठी त्या पात्र ठरल्या. 25 मे रोजी झालेल्या या फेरीत द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी 12,000/-रुपयांचे बक्षीस मिळवले.
यांना वि.गो. साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील यांचे सहकार्य लाभले.

Belgaum Varta Belgaum Varta