बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त सीमाप्रश्नासाठी सीमाभागातून 11 हजार पत्रे पाठविण्याचा आंदोलन घेण्यात आले आहे. या आंदोलनाला शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत “एक पत्र सीमाप्रश्नासाठी” या उपक्रमाला शहापूर विभागातून हजारो पत्रे पाठविण्याचा व या उपक्रमांला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी बैठकीत बोलताना राजकुमार बोकडे यांनी ‘हा उपक्रम स्तुत्य असुन या लाखभर पत्राची दखल देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे नक्की घेतील व आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आशा बाळगू या’ या खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवून हा उपक्रम यशस्वी करुया असे मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवाजी हावळानाचे, राजाराम मजुकर, राजु बोकडे, मनोहर शहापूरकर, शशिकांत काकडे, उमेश भातकांडे, रणजित हावळानाचे, अभिषेक हवालदार, संदेश दावरी यासह अनेक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
