बेळगाव (प्रतिनिधी) : प्रगतशील लेखक संघ व साम्यवादी परिवारातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी ५.३० वाजता साजरी करण्यात येणार आहे. यावेळी प्राध्यापक आनंद मेणसे यांचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील व स्वातंत्र चळवळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर हे अध्यक्षस्थानी राहतील.
गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथील शहीद भगतसिंग सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
