
बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगर परिसरातील एकमेव असलेले आणि जागृत मानल्या गेलेल्या भारत नगर चौथा क्रॉस येथील श्री भूतनाथ मंदिरात महापूजा कार्यक्रम संपन्न झाला. महापूजा निमित्त मंगळवारी होमहवन, पुजा, महाआरती तसेच भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
काल बुधवारी पूजा अभिषेक आणि प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. माजी नगरसेवक दिनेश राऊळ यांनी सपत्नीक पूजा केली. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला राऊळ समाजाचे बंधू-भगिनी तसेच शहापूर, वडगाव, खासबाग परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta