
बेळगाव : कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स व बेळगावी डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने आज मंगळवार सायंकाळी बेळगांवचे नूतन पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस मुख्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. संघटनेचे सचिव श्री. राजेश लोहार यांनी त्यांचा व्यायामपटू व संघटनेच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. अनिल अंबरोळे यांनी पोलिस आयुक्तांना सुवर्ण पदक विजेते श्री. विनोद मेत्री व अंतर राष्ट्रीय पंच श्री. राजेश लोहार यांच्याबद्दल माहिती सांगितली व बेळगांव हे शरीर सौष्ठव क्षेत्रामध्ये, व्यायामपटूबद्दल किती अग्रेसर आहे ही माहिती देण्यात आली, तसेच पोलिस आयुक्तांना येत्या काळात होणाऱ्या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी आमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे खजिनदार श्री. नारायण चौगुले, उपाध्यक्ष श्री. बाबू पावशे व श्री. सुनील बोकडे, श्री. सुनील चौधरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta