
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ६जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.दरवर्षी ६ जून रोजी हा सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२५ मध्ये ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या स्वप्नाचा विजयोत्सव आहे.
या दिनाचे औचित्य साधून नाट्य दिग्दर्शक शिवराज चव्हाण यांनी हा शिवराज्याभिषेक विद्यार्थ्यांसमोर नाटक रुपात सादर केला. यामध्ये शिवराज गवळी, साईराज गुरव, प्राची पतंगे, सायली भोसले, सृजन पाटील, हर्ष पाटील, संकल्प हळदणकर, अजिंक्य देसाई, वेदांत वीर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाहीन शेख यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta