
बेळगाव : जुलै महिन्यात पार पडणाऱ्या वडगाव येथील ग्राम देवता मंगाई देवीच्या यात्रेसाठी शुक्रवारी (ता. २०) पारंपारिक पद्धतीने गाऱ्हाने घालण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.
शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या मंगाई देवीची यात्रा २२ जुलै रोजी पार पडणार असून दरवर्षी यात्रेच्या एक महिना अगोदर गाऱ्हाणे घातले जातात. त्यानुसार शुक्रवारी रात्री आठ वाजता मंगाई देवी मंदिरात विशेष पूजा करून गाऱ्हाने घालण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta