बेळगाव : हरहुन्नरी शिक्षिका शीतल बडमंजी यांची शोकसभा दिनांक ९ जून रोजी मराठी विद्यानिकेतन, गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, माजी विद्यार्थी संघटना मराठी विद्यानिकेतन व मराठा महिला मंडळ यांच्यातर्फे मराठी विद्यानिकेतन येथे शिक्षिका शीतल बडमंजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या, हरहुन्नरी, कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या शीतल बडमंजी यांचे 6 जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने तसेच ‘असेन मी नसेन मी’ या गाण्याने मराठी विद्यानिकेतनचे संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांनी केली. वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, मराठा महिला मंडळच्या सदस्या डॉ. संजीवनी खंडागळे, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, माजी विद्यार्थी शिवराज चव्हाण, वैदेही जाधव, अंकिता कदम, शिवाजीदादा कागणीकर यांच्या सहकारी सर्वोदय भारता आक्का, मराठी विद्यानिकेतनचे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी आपली मते तसेच आठवणी सांगून श्रद्धांजली दिली.
व्यासपीठावर आनंद मेणसे, शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गौरी चौगुले, मराठा महिला मंडळाच्या सदस्या डॉ.संजीवनी खंडागळे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर उपस्थित होते. शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, वि. गो. साठे प्रबोधिनीचे कार्यकारिणी सदस्य, मराठा महिला मंडळाच्या सर्व सदस्या, शिक्षक, मेणसे व बडमंजी कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta