
बेळगाव : जागतिक योग दिनानिमित्त बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सनातन संस्कृती एवं योग सेवा संघाच्या वतीने २२ जून रोजी सूर्यनमस्कार मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कटकोळ यांनी दिली.
आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २५ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, २२ जून रोजी बेळगावात आतापर्यंतचा सर्वात मोठा सूर्यनमस्कार मॅरेथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील मराठा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल, ज्यात ८ वर्षांपासून ते ६० वर्षांवरील वयोगटातील असे ६ विभागांमधून सुमारे ६०० साधक सहभागी होतील. या कार्यक्रमात २४ बक्षिसे दिली जातील आणि सर्वाधिक सूर्यनमस्कार करणाऱ्यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ देऊन सन्मानित केले जाईल, असे डॉ. कटकोळ म्हणाले.यावेळी संघाचे सचिव वैभव वेर्णेकर, सहसचिव विश्वनाथ, कोषाध्यक्ष एम.आय. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta